मुंबई : सोन्याच्या दरात एक दिवस आधी नवा विक्रम निर्माण केल्यानंतर आता त्यात नरमाई दिसून येत आहे. मंगळवारी सोन्याचा भाव 57,322 रुपये प्रति 10 ग्रॅम या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने 56,200 रुपयांचा विक्रम केला होता. मागील विक्रमापेक्षा यावेळी सोन्याच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. तुम्हीही लग्नाच्या हंगामात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज त्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे.
सोने 62 हजारांपर्यंत चढू शकते
येत्या काळात सोन्याचा दर 62 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तसेच चांदीचा भावही 80 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, बुधवारी दोन्ही धातूंचे दर घसरले.मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे.
चांदीच्या दरातही घसरण झाली
बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 109 रुपयांनी घसरून 56860 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर पोहोचला. त्याचप्रमाणे चांदीचा भाव 69 रुपयांनी घसरून 68473 रुपये प्रति किलोच्या पातळीवर पोहोचला. तत्पूर्वी, मंगळवारी बंद झालेल्या व्यापार सत्रात सोने 56969 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 68542 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
बुधवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. बुधवारी सकाळी इंडिया बुलियन्स असोसिएशनने (https://ibjarates.com) जाहीर केलेल्या किमतीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव सुमारे १९० रुपयांनी घसरून ५७१३८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. चांदीचा दरही मंगळवारच्या तुलनेत 190 रुपयांनी घसरला आणि तो 67947 रुपये प्रतिकिलो झाला.
बुधवारी जीएसटीशिवाय व्यवसायादरम्यान, 23 कॅरेट सोन्याचा दर 56909 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेटचा दर 52338 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेटचा दर 52854 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. याआधी मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ५७३२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 68137 रुपये प्रति किलोवर बंद झाला.