बोदवड,(प्रतिनिधी)- पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या “परीक्षा पे चर्चा” कार्यक्रम अंतर्गत भाजपा तर्फे न.ह. रांका हायस्कूल विद्यालय बोदवड येथे आयोजित चित्रकला स्पर्धेस खासदार रक्षा खडसे यांनी भेट दिली.
देशाचे मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून “परीक्षा पे चर्चा” हा कार्यक्रम अंतर्गत “एक भारत श्रेष्ठ भारत” राबविण्यात येत आहे. देशातील मुलांच्या कौशल्य व विविध गुणांना वाव मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे इ.९ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा राबविण्यात येणार असून, आज दि.२२ जानेवारी रोजी बोदवड तालुका ठिकाणी स्पर्धेस सुरवात झाली. यावेळी न ह रांका हायस्कूल विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस सहभागी होऊन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विजेते व स्पर्धकांना यावेळी बक्षीस वितरीत झाले.
यावेळी .खा.रक्षाताई खडसे,अशोक कांडेलकर ,विनोद पाटील , तालुका अध्यक्ष प्रभाकर पाटील, राजूभ ढापसे,अमोल देशमुख, नगर सेवक विजूशेठ बडगुजर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अभिषेक झाबक, संतोष चौधरी, संजय पाटील, वैभव माटे, रोहित अग्रवाल,मयुर बडगुजर,धनराज सुतार, पंकज डिके, युआ मोर्चा तालुक्का अपा अध्यक्ष गणेश लोणारे, उमेश पाटील,विक्रम वरकड ,आकाश सावळे ,विक्रमसिंग पाटील, भागवत चोधारी, न ह रांका हयस्कुल चरमन,सदस्य, शिक्षक व सर्व पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.