मुंबई : अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीची त्याच्या पत्नीनेच जेवणातून विष देत हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुंबईतील सांताक्रूझ परिसरात ही घटना घडली असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कविता हिचे अनैतिक संबंध होते. कविता आणि पती कमलकांत हे दोघे सांताक्रूझ परिसरातील दत्तात्रेय रोड भागातील एका सोसायटीत राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. अनैतिक संबंधांमध्ये कमलकांत हा अडथळा ठरत होता. हा अडथळा कायमचा दूर करायचा असा कट महिलेने प्रियकरासोबत संगनमत करून आखला.
जूनमध्ये कवितानं प्रियकराच्या मदतीने कमलकांतच्या जेवणात विष टाकले. त्यानंतर कमलकांत याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली.
हे पण वाचा..
सावकारी कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने उचललं टोकाचे पाऊल, जळगाव जिल्ह्यातील घटना
VIDEO: फुकट जेवण्यासाठी MBAचा विद्यार्थी लग्नात शिरला ; मग काय, पकडला गेल्यानंतर मिळाली ‘ही’ सजा..
डिझेलबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या काय आहे योजना?
दोन विद्यार्थ्यांकडून वर्गातच विद्यार्थिनीवर आळीपाळीने अत्याचार, मुंबईतील घटना
सांताक्रूझ पोलिसांनी तपास सुरू केला. तपास सुरू असतानाच कमलकांत याची विष देऊन हत्या केल्याची बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून कविता आणि तिचा प्रियकर हितेश या दोघांना अटक केली. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.