मुंबई : महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून अशातच एक संतापजनक घटना समोर आलीय. वडिलांनीच मुलीचा विनयभंग केल्याची घटना मुंबईच्या चेंबूर परिसरात घडलीय. दरम्यान, याबाबत नराधम वडिलांविरुद्ध आरसीएफ पोलीस ठाण्यात विविध कायद्यांतर्गग गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी वडिलांनी अल्पवयीन मुलगी झोपलेली असताना, तिला चुकीचा स्पर्श केला. या घटनेनंतर पीडित मुलगी ही मानसिक तणावात होती. यातूनच मुलीने रेस्टिलच्या गोळ्या घेऊन झोपली. पीडित मुलगी बेशुद्ध अवस्थेत असल्याने तिल जवळील चंद्रा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलगी शुद्धीवर आल्या डाॅक्टरांनी तिच्याजवळ विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
त्यावेळी आरोपी बापाने तेथून पळ काढताना, डाॅक्टरांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, डाॅकटरांना धक्का मारून आरोपीने पळ काढला. अखेर पोलिसात गुन्हा नोंदल्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा..
मोठी बातमी ! घरकूल घोटाळ्याप्रकरणात सुरेश जैन यांना अखेर जामीन मंजूर
ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीवर शिक्कामोर्तब!
शेतकऱ्यांना आता कीटकनाशके घेण्यासाठी दुकानावर जाण्याची गरज नाही, असे घरी बसून मिळेल??
नाशिकमधील नोटा छापण्याच्या कारखान्यात सरकारी नोकरीची संधी; 95,000 रुपये पगार मिळेल
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरात एकटी होती आणि आरोपीने त्याचा फायदा घेतला. मुलीने रेस्टिलच्या गोळ्या घातल्याने ती बेशुद्ध झाली त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तिच्याजवळ विचारपूस केली असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.