चाळीसगाव,(प्रतिनिधी)- वाहन घेण्यासाठी बँकेत बनावट कागदपत्रे सादर केली. अजयसिंग व देशमुख यांनी कागदपत्रांची शहनिशा न करताच एक कोटी तीस लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. बँकेच्या लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आणि त्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की,वाहन कर्जाच्या नावाखाली महाराष्ट्र बँकेची १ कोटी ३० लाखांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी बँकेच्या शाखा व्यवस्थापकासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कर्जदार सुशील भालचंद्र पाटील (रा. पंचवटी,नाशिक), बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापक अजयसिंग व प्रोसेसिंग अधिकारी मंदार चंद्रशेखर देशमुख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत निशांत माणिकराव इलमकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, १ ऑक्टोबर २०२१ आणि १ जानेवारी २०२२ रोजी पाटील याने वाहन घेण्यासाठी बँकेत बनावट कागदपत्रे सादर केली. अजयसिंग व देशमुख यांनी कागदपत्रांची शहनिशा न करताच एक कोटी तीस लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. बँकेच्या लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आला. वरील तीनही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.