सांगली,(प्रतिनिधी)२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्मरणार्थ सांगली ते मुंबई मशालीसह ‘शहीद दौड’ चे आयोजन करण्यात आले होते. सांगली येथील सुमारे 25 तरुणांनी या हल्यातील शहिदांना या वेगळ्या उपक्रमातून श्रद्धांजली वाहिली. २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांसाठी केलेल्या या विशेष उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी तरुणांचे कौतुक केले.
या कार्यक्रमास मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित