बारमेर : मृत्यू हे अंतिम सत्य आहे असं म्हटलं जातं. मानवाला मृत्यू कुठे, कधी आणि कसा गाठेल याबाबत काहीही सांगता येत नाही. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत. यामध्ये एका व्यक्तीचा पेपर वाचत असताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
राजस्थानमधील ही धक्कादायक घटना असून ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Video: ऑफिसमध्ये पेपर वाचताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू
“हे संपुर्ण जग व त्यातील सर्वच भौतिक व चैतन्यमय वस्तु या सर्व परिवर्तनशील व अनित्य आहेत, अस्थीर व अस्थाई आहेत.” – तथागत भगवान गौतम बुद्ध#ViralVideo #HeartAttack #Rajasthan #MarathiNews pic.twitter.com/yb0f4wfeoj
— Akshay Baisane | अक्षय बैसाणे (@Baisaneakshay) November 7, 2022
कुठे घडली घटना?
राजस्थानमधील बारमेर जिल्ह्यात हि घटना घडली आहे. 5 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. मृत तरुण हा घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे आपल्या ऑफिसमध्ये आला होता. ऑफिसमध्ये आल्यानंतर या तरुणाने पेपर घेतला आणि सोफ्यावर जाऊन बसला. यानंतर पेपर वाचत असताना अचानक या तरुणाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि तो जागेवरच कोसळला.
यावेळी समोरच बसलेली एक रिसेप्शनीस्ट महिला देखील घाबरली. काहीतरी पडल्याच्या आवाजावरुन ऑफिसमधील इतर सहकारी हेदखील बाहेर आले आणि त्यांनी तात्काळ तरुणाला रुग्णालयात दाखल केलं, तोपर्यंत तरुणाने प्राण गमावले होते.