पालघर । नाशिक सिलवासा आणि जळगाव सिलवासा या दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या. ही घटना पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्ये घडलीय. बसच्या या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केले आहे.
पोलिसांनी एसटी अपघातातील जखमींना तत्काळ जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून पहाटेच्या सुमारास नाशिक सिलवासा आणि जळगाव सिलवासा या दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या. जव्हार सिल्वासा मार्गावरील जयसागर डॅमजवळ झालेल्या या अपघातात दोन्ही एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.
हे सुद्धा वाचा..
संतापजनक ! जीवे मारण्याची धमकी देत स्कूल व्हॅन चालकाचा 15 वर्षीय मुलीवर बलात्कार
मुंबई पोलीस शिपाई पदाच्या ७०७६ जागासाठी भरती ; असा करा अर्ज, जाणून घ्या पात्रता
राशिभविष्य – ७ नोव्हेंबर : आज या राशींच्या लोकांना मिळेल आनंदाची बातमी..
या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन्ही बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींवर सध्या जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे.