पोलिसांसमोर शिवसेनेच्या नेत्यावर गोळ्या झाडून पंजाबमध्ये सुधीर सुरी यांची हत्याकेल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.पंजाब मधील अमृतसर येथे शिवसेना नेते सुधीर सुरी यांची अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी गोळ्या झाडून हत्या केली. अमृतसर येथील मजिठा रोड या गजबजलेल्या भागातील गोपाल मंदिरनजीक सुधीर सुरी व त्यांचे कार्यकर्ते एका प्रकरणी निदर्शने करत असताना ही घटना घडली. या प्रकरणी हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून हत्येसाठी वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
https://twitter.com/mahadevpr/status/1588538321747447808?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1588538321747447808%7Ctwgr%5Ee2a39e7b5979c8d515eda84be10fe22221be6648%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fd-6993776172402178073.ampproject.net%2F2210211855000%2Fframe.html
गँगस्टरच्या हिटलिस्टवर असलेल्या सुधीर सुरींच्या सुरक्षेसाठी पंजाब सरकारने आठ पोलीस कर्मचारी तैनात केले होते. निदर्शने सुरु असतांना आजूबाजूला पोलिस तैनात होते तरि देखील सुरी यांच्यावर फायरिंग झाली व त्यात ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शिवसेना नेते सुधीर सुरी हे अमृतसरमधील मंदिराबाहेर आंदोलन करत होते. त्यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.यावेळी जमलेल्या जमावामधून कोणीतरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. गर्दीच्या ठिकाणी गोळीबार झाल्याने तिथे प्रचंड गोंधळ उडाला होता.