सिंधुदुर्ग, दि. 4 (प्रतिनिधी) : जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व विभागांनी 100 टक्के निधी खर्च करावा. त्याचबरोबर जिल्ह्याला वाढीव निधी मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नशील आहे, अशी ग्वाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
नियोजन समितीच्या नुतन सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची सभा झाली या सभेला केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उदयोग मंत्री नारायण राणे, मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल उपस्थित होते.
जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी सर्वांचे स्वागत करुन विषय वाचन केले. पालकमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, गतिमान सरकार म्हणून जे जे निर्णय आवश्यक आहेत, ते ते घेतले जातील. गाळ काढल्यानंतर तो शेतात गेला पाहिजे. त्यासाठी तो गाळ आहे की रेती याचा अहवाल तहसिलदारांनी 7 दिवसात द्यावा. जिल्ह्याच्या विकासासाठी सध्याची 182 कोटींची असणारी तरतूद ही निश्चितपणे वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करु. सकारात्मक विचार करुन तरतूद वाढवून घेऊ. हा निधी 100 टक्के खर्च झाला पाहिजे. यासाठी अधिकाऱ्यांनी आपली क्षमता वापरावी. त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या जाणून घेतल्या जातील.
केंद्रीय मंत्री श्री. राणे यांनी जिल्ह्यातील उर्वरीत रस्त्यांचा आराखडा तयार करुन पूर्ण करण्याची सूचना केली.ते म्हणाले, जिल्ह्यातील बालकांना कुपोषणाबाहेर काढून ती संख्या शून्यावर आणावी त्यासाठी कार्यक्रम आखावा. काही जबाबदारी आमच्यावर द्यावी. जिल्ह्यात असणारी रिक्त पदे भरावीत.
आयत्यावेळच्या विषयात श्री. देव रवळनाथ मंदिर अंतर्गत श्री देव गिरोबा, श्री देव लिंग मंदिर, श्री देव नरोबा, श्री देव रवळनाथ जन्मस्थळ मंदिर निरुखे ता. कुडाळ, श्री देव वेताळ मंदिर देवस्थान पेंढून ता. मालवण क वर्ग यात्रा स्थळ घोषित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
Ø जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अनुसुचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना
(बाह्य क्षेत्र) सन 2021-22 माहे मार्च 2022 अंतर्गत 99.99 टक्के खर्च.
Ø सन 2022-23 माहे ऑक्टोबर पर्यंत खर्चाचा तपशील जिल्हा वार्षिक योजना
(सर्वसाधारण) मूळ अर्थ संकल्पीय तरतूद 182 कोटी, प्राप्त तरतूद 53 कोटी 11 लाख खर्चाची टक्केवारी 10.68 टक्के.
Ø अनुसुचित जाती उपयोजना मूळ अर्थसंकल्पीय तरतूद 14 कोटी 78 लाख, प्राप्त तरतूद 4
कोटी 35 लाख
खर्चाची टक्केवारी 8.50 टक्के.
Ø आदिवासी उपयोजना बाह्यक्षेत्र मूळ अर्थसंकल्पीय तरतूद 197 कोटी 17 लाख प्राप्त तरतूद
57 कोटी 54 लाख खर्चाची टक्केवारी 10.50 टक्के.
00000