चाळीसगाव : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार चाळीसगाव तालुक्यात घडला आहे. धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय मुलगी आपल्या आई वडील व भावासह वास्तव्यास आहे. पीडीतेच्या घरासमोर संशयीत आरोपी राकेश युवराज जिरे (22) हादेखील वास्तव्यास असून त्याने पीडीतेशी सलगी वाढवत तुला पसंत करतो, माझ्याशी लग्न कर म्हणत पीडीतेचा पाठलाग करून तिच्यावर सन 2021 ते एप्रिल 2022 दरम्यान वारंवार अत्याचार केला
हे पण वाचा :
जळगाव जिल्ह्यातील माजी आमदारासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल, नेमकं काय आहे कारण?
लग्नाला घरच्यांचा विरोध.. प्रेमीयुगलाने गोव्यात जाणून लग्नाचा निर्णय घेतला, पण नंतर जे घडलं ते..
चोरट्यांचा धुमाकूळ ; चितोडा येथे दुकानाबाहेर लावलेले वाहन लांबविले, चोरटे CCTV मध्ये कैद
२५ वर्षीय नराधमाचा ५ वर्षाच्या चिमुरडीवर भयंकर पद्धतीने अत्याचार
तसेच तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. या प्रकारातून पीडीता गर्भवती राहिली तसेच आरोपीने पीडीतेच्या आई-वडिलांना व भावाला जीवे ठार मारेल, अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. आरोपी राकेश युवराज जिरे (22) याच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्य निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.