मुक्ताईनगर : ठाकरे शिवसेनेतर्फे महाप्रबोधन यात्रेचे नियोजन करण्यात आलेल्या असून त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी सुषमाताई अंधारे यांचे प्रबोधनपर सभा ठेवण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने मुक्ताईनगर मधील आमदार सुद्धा शिंदे गटात सामील झाल्यामुळे मुक्ताईनगर मध्ये सुद्धा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक 4 रोजी संध्याकाळी पाच वाजता मुक्ताईनगर मधील जेडीसीसी बँकेच्या जवळ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेची जय्यत तयारी सुद्धा मुक्ताईनगर मध्ये युद्धपातळीवर सुरू आहे.
हे पण वाचा :
‘या’ राशीच्या लोकांसाठी प्रगतीची दारे खुली होतील, जाणून घ्या तुमची आजची राशी काय म्हणते??
धावत्या रेल्वेत अविवाहित तरुणीने दिला बाळाला जन्म, नंतर शौचालयात सोडून केला पलायन, पण..
शेतकऱ्यांनो सावधान.. जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी आढळले बनावट खत
या सभेला प्रमुख उपस्थिती म्हणून युवा सेना विस्तारक शरद कोळी ,रावेर लोकसभा संपर्कप्रमुख विलासजी पारकर ,रावेर लोकसभा सह संपर्कप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील , जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे ,जिल्हाप्रमुख हर्षल माने, या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे या सभेला संपूर्ण मतदारसंघातून तसेच जिल्हाभरातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवा सेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे यांनी केलेले आहे.