जळगाव । शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. चोरट्यांना पोलिसांचा धाकच राहिलेला नसल्याचे दिसून येतेय. दरम्यान, जळगाव शहरामधील रिंगरोडवर असलेल्या हाउस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज या दुकानात चोरटयांनी हातसफाई केली आहे. दिवाळीच्या गर्दीचा फायदा घेत १ लाख २ हजार ६५९ रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी अभिषेक बाफना यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिंगरोड येथील दीनानाथ वाडीत राहणारे अभिषेक सुनील बाफना यांचे हाउस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज हे दुकान रिंगरोड येथे पीपल्स बँके शेजारी आहे. दिवाळीच्या धामधुमीत दि.२१ च्या रात्री ८.४५ ते दि.२३ च्या सायंकाळी ६.३० च्या दरम्यान गर्दीचा फायदा घेत १ लाख २ हजार ६५९ रुपयांचे दागिने चोरून नेले.
हे सुद्धा वाचा…
नाशिकमध्ये पुन्हा बस पेटली ; घटनेचा थरार VIDEO पहा
फेसबुकवर प्रेम अन् मंदिरात लग्न; वधूचे सत्य समोर येताच तरुणाला बसला धक्का
मी तुम्हाला तोंडभरून भाऊ म्हणते अन् तुम्ही.. सुषमा अंधारेंचा गुलाबरावांवर हल्लाबोल
अति भयंकर ! तांत्रिकाच्या सांगण्यावरून शिक्षकाचे 8 वर्षीय मुलीसोबत घृणास्पद कृत्य
चोरट्यांनी दुकानातून सोने आणि डायमंडचे २ मंगळसूत्र आणि २ अंगठ्या असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी अभिषेक बाफना यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि किशोर पवार करीत आहेत.