जळगाव, दि.31 (प्रतिनिधी) :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा संकुल पासून ते नंदिनीबाई मुलीच्या शाळेजवळून व कोर्डापासून ते बस स्टॅड पर्यंत व शिवाजी चौक येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीत शहरातील खेळाडू, विविध सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. महानगरपालिकचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, महापौर श्रीमती जयश्री महाजन, जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत, एकता दौडच्या सुरूवातीस योगाचे प्रात्यक्षिक करण्यात आले. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी उपस्थितांना एकात्मतेची शपथ दिली. सदर एकता दौड मध्ये जि.प. महानगरपालीका जळगांव महसूल, पोलीस तसेच इतर शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी, क्रीडा शिक्षक, खेळाडू, पोलीस भरती प्रशिक्षणार्थी, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील खेळाडू खेलो इंडीया बॉक्सींग केंद्रातील खेळाडू, नागरीक यांनी उत्फुर्तपणे भाग घेवून एकता दौड यशस्वी केली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा क्रोडा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एकता दौडचे यशस्वी आयोजन करण्यात आले. असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.