रावेर: तालुक्यातील ऐनपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जनसंवाद यात्रे निमित्ताने सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर कडाडून टीका केली. विरोधक रोज म्हणतात कुछ ना कुछ होनेवाला है. मात्र, कुछ नही होनेवाला है. मै तुम्हारे उरा पे बैठनेवाला हूँ. मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या ऊरावर बसेन, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे
विरोधकांकडून सातत्याने छळ करून मला अडकविण्यात येत आहे. काही ना काही खोटे नाटे करून मला जेलमध्ये टाकायचे आणि निवडणुका सुरळीत करायच्या, असा त्यांचा प्रयत्न आहे. पण तुम्हा जनतेच्या आशीर्वादाने मी सर्वांना पुरून उरेल, असे म्हणत एकनाथ खडसेंनी सरकारला आव्हान दिले आहे. माझा कितीही छळ केला. मला कितीही त्रास दिला तरी मी सर्वांच्या ऊरावर बसेन, असा हल्लाबोलही त्यांनी सरकारवर केला.
हे पण वाचा..
खडसेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला धक्का ; अनेक पदाधिकऱ्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश
शिंदे सरकारमधील मंत्र्याने जिल्हाधिकाऱ्यांना विचारला भलताच प्रश्न.. VIDEO क्लीप व्हायरल
घरी एकटी असताना प्रेयसीनं प्रियकराला बोलावलं; पण तितक्यात तिचा काका, मग…
आजचे राशिभविष्य : खर्चाकडे लक्ष द्याल, अवास्तव वाद टाळा, वाचा तुमची राशी काय म्हणते ..
रवी राणा आणि बच्चू कडू वादावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राणांनी बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावर बच्चू कडू यांनी पुराव्यानिशी आरोप सिद्ध करण्याचं आव्हानच दिलं आहे. बच्चू कडू यांनी आपल्या संपर्कात सात ते आठ आमदार असून पुरावे नाही दिले तर निर्णय घेण्याचा इशाराही दिला आहे. त्यांनी एकप्रकारे सरकारलाच आव्हान दिलं आहे. बच्चू कडू यांची ही सुरुवात आहे. त्यामुळे शिंदे गटात गेल्या बंडखोरांमध्ये अस्वस्थता आहे. हळूहळू ही अस्वस्थता बाहेर येत आहे. बच्चू कडू यांच्या माध्यमातून ही सुरुवात आहे, असा दावा खडसे यांनी केला.