जळगाव : शिंदे गटात असलेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील आपल्या काय झाडी, काय डोंगार, काय हाटील… ओक्केमधी सगळं या वक्तव्यानंतर चर्चेत आले. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पूर्वीच्या हलाखीच्या परिस्थिती बाबत भाष्य करताना आपण आपल्या बायकोला लुगडं सुद्धा घेऊ शकलो नाही अशी खंत व्यक्त केली होती. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी शहाजीबापू यांना टोला लगावत बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला? अस म्हंटल आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे म्हणाले, शहाजीबापूंनी त्यांची पूर्वीची स्थिती सांगितली तेव्हा त्यांनी म्हंटल की त्यावेळी शरद पवारांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही. बायकोलाही साडी घ्यायला पैसे नव्हते. शहाजीबापूंनी हे वक्तव्य कदाचित गमतीनं किंवा उद्वेगानं केलं असेल. आपल्या बायकोलाही साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला? असा खोचक सवाल करत शहाजी बापूंनी जे म्हटलं आहे, हे कोणत्या हेतूने म्हटलं हे मला माहिती नाही मात्र शहाजी बापूंची परिस्थिती आमदार झाल्यापासून सुधारली आहे. त्यामुळे त्यांना आता कोणाकडे आशेनं बघण्याची आवश्यकता नाही असं खडसे म्हणाले.
हे सुद्धा वाचा..
दिवाळीनंतर सोन्याचा भाव पुन्हा वाढला ; खरेदी करायचं असेल तर जाणून घ्या आजचा दर
बच्चू कडू सरकारशी काडीमोड घेणार? नेमकं काय आहे कारण??
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती ; त्वरित करा अर्ज
शहाजीबापू नेमकं काय म्हणाले होते –
१९ वर्ष सातत्याने माझ्या घरात गरीबी होती. मी माझ्या बायकोला साधी नवी साडी देखील घेऊ शकलो नाही परंतु मी जनतेचे प्रश्न सोडवण्यात कुठेही कमी पडलो नाही. मात्र माझ्या गरिबीच्या काळात मी पक्षाचा कार्यकर्ता असूनही शरद पवार आणि अजित पवार हे माझ्यासोबत नव्हते याचे शल्य मला आयुष्यभर बोचत राहील, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले होते.