जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघात दूध पावडर व लोणी साठ्यात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन एकनाथ खडसे गट तसेच भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या तक्रारींची चौकशी करून या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
नेमकी काय आहे घटना?
जिल्हा दूध संघात अपहार झाल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी तक्रार दिली होती. त्यात म्हटलं होते की जळगाव जिल्हा दुध संघातून सुमारे १४ टन बटर (लोणी) व ८ ते ९ टन म्हशीच्या दुधाची भुकटी (मिल्क पावडर ) सुमारे २ ते २.५ कोटी रुपये मुद्देमालाची परस्पर विल्हेवाट लावुन टाकण्यात आलेली आहे. असे म्हटले होते. तर दुसरीकडे जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एकनाथ खडसे यांनी आंदोलन केले. एकनाथ खडसे गटाच्या वतीने चोरीची तक्रार पोलिसात नोंदविण्यात आली होती.
जिल्हा दूध संघाबाबत अपहार व चोरी झाल्याबाबत एकुण तीन तक्रारी आलेल्या आहे. या अनुषंगाने तीनही तक्रारींची प्राथमिक चौकशी घेण्यात आलेले जबाबानुसार दुध संघात एकुण १ कोटी १५ लाख रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा..
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली ; PM किसान योजनेचे 2000 रुपये बँक खात्यात जमा
अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
तरुणीचे दोन सख्ख्या भावांवर प्रेम जडलं, मग.. पुढे काय झालं वाचा
या घोटाळयात पोलिसांनी थेट कुणाचेही नाव न घेता या घोटाळ्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने दूध संचालक मंडळ अन्य याला जबाबदार कोण आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, या घटनेत पोलीस काय तपास करतात?, जिल्हा दूध संघाच्या घोटाळ्यात नेमकं कोण दोषी म्हणून समोर येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.