मुंबई : भारतीय सराफा बाजारात सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरातआज मोठी घसरण नोंदवण्यात आली. ताज्या दरांवर नजर टाकली तर दहा ग्रॅम सोन्याचा भाव घसरणीसह ५० हजारांच्या पुढे राहिला, तर एक किलो चांदीचा भाव ५५ हजारांच्या पुढे आहे.
ट्रेडिंग आठवड्याच्या पहिल्या सत्रात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 313 रुपयाची .घसरण झाली असून यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 50,373 रुपयांपर्यंत खाली आली आहे. तर आज चांदीच्या किमतीत 724 रुपयाची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा एक किलोचा दर 55,950 रुपयावर आला आहे.
हे सुद्धा वाचा..
अंधेरी पोटनिवडणुकीबाबत भाजपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
तरुणीचे दोन सख्ख्या भावांवर प्रेम जडलं, मग.. पुढे काय झालं वाचा
धमक्या देऊ नका, धमक्या द्याल तर..; गुलाबराव पाटलांना ठाकरे गटाच्या नेत्याचा इशारा
धावत्या ट्रेनमधून प्रवाशाने तरुणाला बाहेर फेकलं ; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल
गेल्या अनेक दिवसांपासून वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण होत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत उच्च पातळीवरून १७०० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली असून आज, व्यापारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये कमालीची घट दिसून येत आहे. धनत्रयोदशी या आठवड्यात शनिवारी सोने आणि चांदी खरेदीसाठी सर्वात मोठा सण आहे आणि त्यापूर्वी सोने आणि चांदी तुम्हाला खरेदीसाठी भरपूर संधी देत आहेत.