नवी दिल्ली : देशात महिलासह मुलींवर होणारे अत्याचार काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. अशातच नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आलीय. बिहारमधील पाटणा येथे चुलत भाऊ आणि नात्यातील आजोबांनी अल्पवयीन मुलीवर घृणास्पद कृत्य केलं आहे. दोघांनी मिळून या सामूहिक बलात्काराचा व्हिडिओही बनवला.
पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत. पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती सायकलने कोचिंगला जात होती. वाटेत तिला आरोपींनी अडवले आणि बळजबरीने निर्जनस्थळी नेले आणि तिच्यासोबत दोघांनी आलटून-पालटून घाणेरडे काम केले.
याबाबत एसएसपी मनीष कुमार यांनी सांगितले की, ही घटना ७ ऑक्टोबर रोजी घडली. पीडितेने 12 ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडितेने सांगितले की, नातेसंबंधात असलेल्या चुलत भाऊ आणि आजोबांनी तिच्यावर बलात्कार केला. ती कोचिंगसाठी घरून निघाली होती. त्यावेळी त्याच्यासोबत ही घटना घडली. आरोपीचे वय सुमारे 20 ते 25 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. एकाला अटक करण्यात आली असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.