मुंबई : राज्य शासनाच्या वतीने कर्ज माफी योजना ही राबविण्यात आलेली होती, त्या कर्ज माफी योजनेत अनेक शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ झालेले आहे. परंतु जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करत होते, अश्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत 50,000 रुपये प्रोत्साहन पर अनुदान ही देण्यात येणार आहे.
दरम्यान, 50 हजार प्रोत्साहनसाठी जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. आणि सर्व 50 हजार प्रोत्सानासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीच्या ज्या यादी आहेत. या सीएससी पोर्टल वरती या ठिकाणी आलेले आहेत. तर आता या ठिकाणी कोण पात्र आहेत ? कोण आपत्र आहेत यांचे स्टेटस ऑनलाइन पद्धतीने कसे चेक करायचा आहे. याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
पहिल्या टप्प्यांमध्ये किती शेतकरी या ठिकाणी 50 हजार प्रोत्साहनसाठी लाभ घेतील किंवा या ठिकाणी पहिल्या टप्प्यात किती शेतकरी पात्र ठरविण्यात आलेली आहे. तर त्याकरिता आपल्या जवळील सीएससी सेंटरला आपल्याला भेट द्यायची आहे. अर्थातच सेतू, आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन आपल्याला यादी पाहता येणार आहे.
हे या ठिकाणी आधार नंबर आणि विशिष्ट क्रमांक जर आपल्याकडे आधार नंबर असेल तर आपण आधार नंबर ने सर्च करू शकता. किंवा डायरेक्टली यादी जर पाहिजे असल्यास सीएससी सेंटरला भेट देऊन त्याठिकाणी आपण यादी बघू शकता. तर अशाप्रकारे आपण ही माहिती जाणून घेऊ शकता.