जळगाव : गुणवत्ता व दर्जाचे हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडुनच खरेदीस प्राधान्य द्या, बनावट व भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडुन पावतीसह खरेदी करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी वैभव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन, पिश्वी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची काढनी होईपर्यंत जपून ठेवावे.
भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सिलबंद / मोहरबंद असल्याची खात्री करावी, बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावर अंतीम मुदत व लॉट क्रमांक पाहुन घ्यावा, कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारींसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधावा.
हे सुद्धा वाचा..
फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘हे’ स्मार्टफोन फक्त 1,000 रुपयामध्ये खरेदी करा ; जाणून घ्या जबरदस्त ऑफरबाबत
..तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, एकनाथ खडसे यांचे विधान
मोदी सरकारने केली मोठी घोषणा, पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, एलपीजीच्या किमतीही कमी होणार!
खळबळजनक ; जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमधील कुंटखाण्यावर छापेमारी, तरूणी, महिलांसह पुरुष ताब्यात
आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष / दुरध्वनी/ ईमेल/ एस.एम.एस/ इ. व्दरे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद जळगाव वैभव शिंदे यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.