आश्चर्य वाटत असेल पण बातमी खरी आहे की,आता पती-पत्नी तुरुंगात एकांतात वेळ घालवू शकणार आहेत.एकांतात वेळ घालवण्यासाठी एक खोली देखील उपलब्ध करून देण्यात येणार असून या दरम्यान विवाहित पतिपत्नीला शाररिक संबंध प्रस्थापित करण्याची मुभा मिळणार आहे. ही सुविधा पंजाब कारागृहामध्ये मिळणार आहे अशी सुविधा देणारे पंजाब हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.पंजाबमधील तुरुंगात असलेल्या बंद कैद्यांना आता अशी सुविधा मिळणार आहे.
जे कैदी प्रदीर्घ काळा पासून तुरुंगात आहेत,मुलाच्या आई किंवा वडिलांना प्राधान्य मिळेल,पॅरोलसाठी पात्र असलेल्या कैद्यांना प्राथमिक यादीत शेवटी ठेवले जाणार आहे.पंजाब सरकारच्या म्हणण्यानुसार अनेक देशांमध्ये अशा भेटीला परवानगी आहे. यामध्ये अमेरिका, फिलिपिन्स, कॅनडा, सौदी अरेबिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्ससह अनेक देशांचा समावेश आहे.
गुंड किंवा अधिक धोकादायक कैद्यांना त्यांच्या पती किंवा पतींना भेटण्याची परवानगी नाही. नमूद केलेल्या नियमांनुसार, उच्च जोखमीचे कैदी, गुंड आणि दहशतवादी यांना ही सुविधा मिळणार नाही. तसेच लैंगिक शोषण, लैंगिक अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्यांना ही सुविधा मिळणार नाही. तसेच ज्या कैद्यांना टीबी, एचआयव्ही, लैंगिक आजार आहेत त्यांनाही ही परवानगी मिळणार नाही. अशा परिस्थितीत कारागृहातील डॉक्टरांकडून मंजुरी घ्यावी लागेल.गेल्या तीन महिन्यांत कारागृहात कोणताही गुन्हा केलेल्यांनाही ही सुविधा मिळणार नाही.ज्यांनी तीन महिने कर्तव्य बजावले नाही त्यांनाही या सुविधेचा लाभ मिळणार नाही.कारागृहात चांगली वागणूक नसणारे आणि तुरुंगाची शिस्त मोडणाऱ्यांनाही ही सुविधा मिळणार नाही.