नवी दिल्ली : केंद्र सरकार व राज्य सरकारकडून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये काही योजना विद्यार्थ्यांसाठी तर काही वृद्धांसाठी आहेत. याशिवाय सरकार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदतही करते. केंद्र सरकारची अशीही एक योजना आहे, ज्यामध्ये मुलाच्या जन्मावर पैसे दिले जातात.
ही रक्कम कोणाला मिळते
‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने’ अंतर्गत, गरोदर असलेल्या आणि पहिल्यांदा स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत दिली जाते. ही योजना ‘प्रधानमंत्री गर्भधारणा सहाय्य योजना’ म्हणूनही ओळखली जाते.
ही रक्कम 4 हप्त्यांमध्ये दिली जाते
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गरोदर व तिच्या पतीचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक फोटोस्टॅट असणे आवश्यक आहे. बँक खाते संयुक्त नसावे. गरोदर महिलेला 6000 रुपये 3 हप्त्यात दिले जातात.
महिलांच्या खात्यात पैसे येतात
या योजनेचा उद्देश प्रथमच मातांना पोषण देणे हा आहे. रु.6000 पैकी पहिला हप्ता रु.1000, दुसरा हप्ता रु.2000, तिसरा हप्ता रु.1000 आणि चौथा हप्ता रु.2000 आहे. सरकारी नोकरी करणाऱ्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
हे पण वाचा :
खुशखबर…! धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीत विक्रमी घसरण, काय आहे आजचा भाव?
महिलेसोबत न्यूड कॉल महागात पडला, जळगावातील एकाला मागितले 2 लाख
खळबळजनक : भाजपच्या शहराध्यक्षाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
पक्ष चिन्हांबाबत शिंदे गटाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला पाठविले हे 3 पर्यायी चिन्ह
अर्ज कसा करायचा
तुम्ही ASHA किंवा ANM द्वारे PM मातृत्व वंदना योजनेअंतर्गत अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता. योजनेचा लाभ सर्व महिलांना दिला जातो. त्यांची प्रसूती सरकारी दवाखान्यात झाली की खाजगी रुग्णालयात.
2017 मध्ये योजना सुरू केली
मोदी सरकार चालवत असलेल्या या योजनेचे नाव ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ आहे. त्याअंतर्गत त्या वेळी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. ही योजना जानेवारी 2017 मध्ये सुरू करण्यात आली.