भुसावळ : जळगाव जिल्ह्यात महिलांसह मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना वाढतच आहे. अशातच आता एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 12 वर्षीय मुलीला लग्नाचे आामिष दाखवून तिचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. पीडितेच्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला भावेश योगेश तायडे (वय 18) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
नेमकी काय आहे घटना?
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटले की, संशयित आरोपी भावेश याने सर्वप्रथम 23 जुलै रोजी शाळेच्या गेटवर पीडित बालिकेस बोलावून तिची भेट घेतली. मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे सांगून तो तिला त्याच्या स्कुटीवर बसवून सात नंबर पोलिस चौकीच्या मागे पडीक रेल्वे क्वार्टरच्या रुममधे घेवून गेला. तू मला खुप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे तिच्याशी गोड बोलून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पून्हा 19 ऑगस्ट रोजी त्याने तिला शाळेच्या गेटवर बोलावून स्कुटीवरून बसवून नेत जामनेर रोडवरील एका धार्मिक स्थळानजीक एका गार्डनमधे नेले. त्याठिकाणी देखील भावेशने पीडितेसोबत अंगलटपणा केला. तसेच गेल्या दोन महिन्यापासून सतत पीडितेचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवले.
हे पण वाचा :
खळबळजनक : भाजपच्या शहराध्यक्षाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
पक्ष चिन्हांबाबत शिंदे गटाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला पाठविले हे 3 पर्यायी चिन्ह
तुझे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करील… तुझ्या मुलाला मारुन टाकेल, धमकीनंतर महिलेवर…
..ही तर अफझल खान, औरंग्याच्या विचारांची अवलाद ; नवीन चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका
यानंतर भावेशने पिडीतेला तिचे घर सोडून त्याच्या घरी येण्यास सांगितले. त्यानुसार 10 ऑक्टोबर रोजी भल्यापहाटे साडेचार वाजता पिडीता पालकांच्या संमतीशिवाय घर सोडून भावेशकडे गेली. याप्रकरणी पिडीत बालिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला भावेश तायडे याच्याविरुद्ध गु.र.न. 172/22 भा.द.वि. 376(1), 376 (2), (आय), 363, 354, अ (1) (आय), 354 (ड), 323, 506 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4,8,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश यास अटक करण्यात आली असून स.पो.नि. प्रकाश वानखेडे पुढील तपास करत आहेत.