पाचोरा (प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने घाईघाईने शनिवार दि. ०९/१०/२०२२ रोजी शिवसेना पक्षाचे पक्षाचे नाव ” शिवसेना” व चिन्ह “धनुष्यबाण” गोठविले प्रकरणी पाचोऱ्यात शिवसैनिकांनी जाहीर निषेध नोंदवीला आहे.
प्रांत धिकाऱ्यांना दिले शिवसैनिकांनी निवेदन
दिलेल्या निवेदनात शिवसैनिकांनी म्हटले आहे की,वास्तविक आमच्या पक्षाचे आवश्यक ती माहिती वेळेच्या
आत निवडणूक आयोगाकडे पोहचवली होती व संपूर्ण विचारांती निर्णय घेण्याची विनंती केली होती.परंतु निवडणूक आयोगाने दबावाखाली घाईघाईने निर्णय घेवून आमच्या पक्षाचे नाव “शिवसेना” व चिन्ह “धनुष्यबाण”गोठविले त्याबद्दल पाचोरा -भडगांव तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाचा जाहिर निषेध करतो असं म्हटलं आहे.
त्याच वेळी ज्यांच्या बंडखोरीमुळे सदरचा प्रकार घडला त्या मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या४० सहकाऱ्यांचा जाहिर धिक्कार करतो.महाराष्ट्राचा विकासासाठी, गोरगरीबांच्या कल्याणासाठी, हिंदुत्वाचा रक्षणासाठी,शिवसेनाप्रमुख वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांनी जिवाचे रान करुन प्रतिकुल परिस्थीतीमध्ये शिवसेना पक्षाची उभारणी करुन महाराष्ट्राची व देशाची सेवा अविरतपणे केली तो शिवसेना संपविण्याचे षडयंत्र करणाऱ्यांना जनताजनार्दन त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.हा निकाल म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचे महापाप आहे.
छत्रपती शिवरायांची महाराष्ट्राची भुमी पापांन्या क्षमा करणार नाही.पुनश्च: या निकालाचा जाहिर निषेध करतो,या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी यांना देत निषेध व्यक्त केला.सदर निषेध मोर्चा शिवसेना नेत्या वैशाली ताई सुर्यवंशी, जिल्हा प्रमुख दिपकसिंग राजपूत ,अरूण रूपचंद पाटील, अँड अभय पाटील, रमेश जी बाफना, दिपक पाटील,गोरख पाटील,अनिल पाटील,शरद पाटील,शाम पाटील,माधव जगताप, संदिप जैन प्रविण पाटील,जिभाऊ पाटील,दत्ता जडे,दादाभाऊ चौधरी,पप्पु राजपूत यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.