मुंबई,(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाला निवडणुक आयोगाने नव्या नावाचे व चिन्हाचे वाटप केले आहे.निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं असून दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा वापर करता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचे नाव देखील लावता येणार नाही असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते दरम्यान आज दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत मोठा निर्णय दिला. यानंतर ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर ट्विटर वर जाहीर करण्यात आले आहे.
हे मिळाले नावं व चिन्ह…
ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळालं आहे.चिन्हाबाबतही निवडणुक आयोगाने निर्णय दिला आहे. ठाकरे गटाला ‘मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे. तर, चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत.
हाती घेऊ "मशाल" रे!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
निशाणी : मशाल pic.twitter.com/ryPOTMikxX— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 10, 2022
या पोस्टरवर ठाकरे गटाचे शिवसेनेचे मशाल हे नवे चिन्ह दिसत आहे. तसेच ठाकरे गटाच्या पक्षाचे नवे नाव ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे दखील दिसत आहे.अंधेरी पोट निवडणुकीत ठाकरे गट हेच नाव आणि चिन्ह वापरणार आहे.