मुंबई,(प्रतिनिधी) – आज पर्यंत तुम्ही सोनं, ड्रग्ज च्या तस्करीच्या बातम्या वाचल्या असतीलचं मात्र थेट दुर्मिळ प्रजातीचे साप, कासव, सरडे याची तस्करी ते देखील परदेशातून विमानाने थेट मुंबई विमानतळावर आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून जवळपास ६६५ विविध दुर्मिळ प्रजातीचे साप, कासव, सरडे यांची तस्करी झाल्याचे उघड झाले असून डीआरआयच्या पथकाने याप्रकरणी कारवाई केली आहे.
मलेशिया येथून मुंबई विमानतळावर आलेल्या दुर्मीळ प्रजातीच्या साप, सरडे, कासव, घोणस अशा एकूण ६६५ प्राण्यांच्या तस्करीचे रॅकेट केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी पकडले आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबत ही संयुक्त कारवाई केली. याप्रकरणी मुंबईतील दोघांना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार मुंबई विमानतळाच्या कार्गो कॉम्प्लेक्स येथे मलेशिया येथून एक पार्सल आले होते. याद्वारे काही तस्करी होत असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
Maharashtra | Directorate of Revenue Intelligence (DRI), Mumbai Zonal Unit seized 665 animals of many exotic species in an import consignment from Air Cargo Complex, Mumbai. This is one of the biggest seizures of rare and exotic wildlife species in Mumbai: DRI pic.twitter.com/wssGOLizcK
— ANI (@ANI) October 8, 2022
अधिकाऱ्यांनी या पार्सलची तपासणी केली असता यामध्ये या दुर्मीळ प्रजातीचे प्राणी आढळून आले. हैं पार्सल उघडल्यानंतर ६६५ प्राण्यांपैकी ५४८ जिंवत आढळून आले, तर उर्वरित मृतावस्थेत आढळले. या प्राण्यांची किंमत २ कोटी ९८ लाख रुपये इतकी आहे.
या प्रकरणी डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी धारावी येथील रहिवासी असलेल्या राजा आणि माझगाव येथील रहिवासी असलेल्या व्हिक्टर लोबो या दोघांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेले हे दुर्मीळ प्राणी वनखात्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या वाचा
व्हिडीओ ; शिवसेना नावं,चिन्ह गोठवल्या नंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच बोलले… काय म्हणाले पहा
धनुष्यबाण गोठवल्याच्या निर्णयावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा..
चिन्ह गोठवले, पण रक्त पेटवले ; शिवसेनेचा ‘सामनातून’ प्रहार
निवडणूक चिन्ह गोठवणं हे अत्यंत क्लेशदायक ; निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर खडसेंची प्रतिक्रिया