मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- तालुक्यातील दुई शिवारातील केळी पिक असलेल्या शेताच्या बांधावर खुट्या लावून तार बांधले आणि त्यात शेतातील डीपी वरून अनधिकृत पणे विद्युत प्रवाह सोडला, या तारांना एका अनोळखी पुरुषाचा वय अंदाजित(४० ते ४५ वर्ष) स्पर्श झाल्याने त्याला जीव गमवावा लागल्याने आरोपी विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
केळी पिकाचे शेताला खुटया मारुन तारेचे कंपाउंड करुन त्यास त्यांचे शेतातील पुरवठा झाल्याने यातील अनोळखी इसम यास त्याचा स्पर्श होवुन मयत झाला आहे बाबत वैद्यकीय अधिकारी उपजिल्हार रुग्णालय मुक्ताईनगर यांनी पोस्ट मार्टम रिपोर्ट मध्ये Death due to Eleckrocaution ( विद्युत करंट लागुन मयत ) असा स्पष्ट अभिप्राय दिला असुन तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ( उपकार्यकारी अभियंता मुक्ताईनगर उपविभाग ) यांनी स्पष्ट अभिप्राय दिल्याने गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला तपासी अंमलदार :- पो उ नि राहुल बोरकर नेम मुक्ताईनगर हे करित आहे.
सदर घटना मुक्ताईनगर तालुक्यातील गट नं २५ मधील केळी पिकाचे शेताचे बांधावर २१ रोजी सकाळी १०.०० वा पुर्वी झाली असून या प्रकरणी पोलीस नाईक धर्मेंद्र नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भागवत जावळे रा.दुई, ता. मुक्ताईनगर जि. जळगांव यांच्या विरुद्ध दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी गु.र.न. व कलम भाग – ५ CCTNS No. ३३६/२०२२ भा.दं.वि. कलम ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे पण वाचा….
चिन्ह गोठवले, पण रक्त पेटवले ; शिवसेनेचा ‘सामनातून’ प्रहार
मुलीनेचं केला आईचा खून ; कारण वाचून बसेल धक्का !
‘या’ अपघाताचा VIDEO पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही