झारखंड : नवरा-बायकोमधील भांडणं होणे काही नवीन नाही. लहान लहान गोष्टीवरून अनेकवेळा भांडणी होत असतात. काहीवेळा ही भांडणे विकोपाला जातात. मात्र त्यांच्या या भांडणात अनेकदा मुलेही नाहक होरपळली जातात, याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. मात्र झारखंडमध्ये पती-पत्नीच्या वाद थेट मुलीच्या जीवावरच बेतला.
झारखंडमधील लोहरदगा जिल्ह्यात नवरा-बायकोच्या भांडणातून एका पित्याने आपल्या ४ वर्षांच्या मुलीला जिवंत जाळले. या घटनेत पीडित चिमुकली 80 टक्के भाजली असून, तिला उपचारासाठी रांची येथील रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पप्पू तुरी असे आरोपी पित्याचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे पप्पू दारु पिऊन घरी आला आणि पत्नीशी भांडण करु लागला. या भांडणातून त्याने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्नी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळून गेली. पत्नी बाहेर पळाल्यानंतर सनकी पप्पूने घराचा दरवाजा आतून बंद केला आणि 4 वर्षाच्या मुलीवर आपला राग काढला. पप्पूने मुलीला पेटवले. मुलीचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले आणि त्यांनी मुलीची आगीतून सुटका करत तिला सदर रुग्णालयात दाखल केले.
हे पण वाचा :
रेल्वेचा मोठा झटका! या गाड्यांचे भाडे वाढले, वाचा कितीने झाली वाढ?
अल्पवयीन मुलीला झोपडीत नेऊन केला आळीपाळीने अत्याचार ; महाराष्ट्र हादरला
‘या’ अपघाताचा VIDEO पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही
तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार ; राज्यातील भाजप आमदाराला PFI ची धमकी
मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर तिला रांची येथील रिम्स रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी किस्को पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत