जळगाव : राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत असल्याचे दिसून आले. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात मागच्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने जोरदार हजेरा लावली. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आज शनिवारी संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच पुढचे 5 दिवस जळगावसह राज्यातील विविध भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे.
राज्यात सर्वच जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर उद्या म्हणेजच (दि.09) ऑक्टोबर रोजी पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील काही भागांत 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.
देशातील अनेक भागात सध्या पाऊस सुरु आहे. गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 दिवस कर्नाटकचा अंतर्गत भाग, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु आहे. आग्रा, ग्वाल्हेर या भागातून मान्सून माघारी परतला आहे.
हे पण वाचा :
रेल्वेचा मोठा झटका! या गाड्यांचे भाडे वाढले, वाचा कितीने झाली वाढ?
अल्पवयीन मुलीला झोपडीत नेऊन केला आळीपाळीने अत्याचार ; महाराष्ट्र हादरला
‘या’ अपघाताचा VIDEO पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही
तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार ; राज्यातील भाजप आमदाराला PFI ची धमकी
परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान
पावसाला पोषक हवामान असल्याने उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यात राज्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुरूच आहे. कमी कालावधीत पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पाणीच पाणी होत असून, नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. सततच्या पावसाने पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
मागच्या 24 तासांत उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी ही झाली. लगतच्या देऊळगाव माळी (ता. मेहकर, जि. बुलडाणा) मंडळात अतिवृष्टी झाल्याने व पेनटाकळी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडल्याने पैनगंगेला पूर आला. सोयाबीन, तूर, कपाशी, मका पिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.