पुणे : अलीकडे रस्ते अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अनेकदा रस्त्यावरुन जाताना वाहने अतिशय सावकाश चालवण्याचा आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, रस्त्यावर मृत्यू कसा, कधी आणि कुठून अंगावर येईल, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे लोकांनी सावधिगिरी बाळगली पाहिजे. दरम्यान, नाशिक महामार्गावर घडलेल्या अपघाताचा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
काय आहे नेमके प्रकरण?
पुणे नाशिक महामार्गावर चाकण आंबेठाण चौकात महामार्गालगत एक तरुण आपल्या दुचाकीसह उभा होता. मात्र थोड्या वेळाने आपल्यासोबत काय घडेल याची जरासुद्धा कल्पना त्याला नव्हती. दुचाकीवर उभा असलेल्या या तरुणाला पिकअप मालवाहू गाडीने मागून येऊन धडक दिली. हि धडक (accident) एवढी भीषण होती कि हा तरुण फुटबॉल उडावा असा उडून बाजूला पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.संतोष पाचरणे असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
पुणे नाशिक महामार्गावर पिकअप गाडीची दुचाकीस्वाराला धडक, घटना CCTV मध्ये कैद pic.twitter.com/GONUpf1Gke
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) October 8, 2022
नाशिकमध्ये खाजगी बसने घेतला पेट
औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास एक भीषण अपघात (accident) झाला.या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने जागीच पेट घेतला. दुर्दैवाने या आगीत बसमधील जवळपास दहा प्रवासी जळून खाक झाले आहेत. हि बस यवतमाळ येथून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला.