नाशिक,(प्रतिनिधी)- नाशिक येथील औरंगाबाद रस्त्यावरील हॉटेल मिरची चौकात चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात आज दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ रोजी शनिवारी पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास भीषण अपघातात झाला असून अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हलच्या खाजगी बसने पेट घेतला. या आगीत बसमधील जवळपास १० प्रवासी जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले असून या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर बस पन्नास ते साठ फूट पुढे घसरत गेली तर टँकर सत्तर ते ऐंशी मीटर पुढे गेले. अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले. या घटनेत 10 लोक जळून खाक झाले तर 34 जणांवर उपचार सुरू आहेत.
Maharashtra: 10 people died & 21 injured after a bus coming from Yavatmal to Mumbai collided with a truck going to Pune from Nashik. All injured are being treated in Nashik. Govt will bear all medical expenses of the injured: Dada Bhuse, Guardian Min of Nashik to ANI
(File pic) pic.twitter.com/YKQramhbY7
— ANI (@ANI) October 8, 2022