पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा भडगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ .यांच्या जनसंवाद यात्रा दौरा सुरू झाला असून या दौऱ्यात विविध गावातून प्रचंड उत्साह व प्रतिसाद मिळत आहे कार्यकर्ते गावकरी सभेमध्ये आपल्या समस्या मांडताना दिसत आहेत.
केंद्रात व राज्यात सरकारतर्फे प्रचंड महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या मालास कुठलाच स्थिर भाव नसल्याने हवालदिल झालेला शेतकरी खेड्यांमध्ये बेरोजगार असलेले तरुण विविध गावातील समस्या जाणून घेण्यासाठी देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय शरदचंद्रजी पवार व माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने या संवाद यात्रेस सुरुवात झाली असून प्रत्येक गावात जाऊन कार्यकर्ता व गावकऱ्यांची संवाद साधून समस्या जाणून घेतल्या जात आहेत.
यात्रा जुवारडी येथे आली असता ग्रामस्थांनी प्रमुख तीन मागण्या मायनर पाटचारी नदीजोड प्रकल्प दुरुस्ती करणे, वन्यप्राण्यांनि धुमाकूळ घालून पिकांचे केलेले नुकसान काढण्यासाठी उपाययोजना करणे ,युवकांसाठी प्रशस्त व्यायामशाळा बांधून देणे,वीज ची मोठी समस्या. लक्षात घेता संबंधित विभागाशी चर्चा करणे, पाटचारित गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळवण्यासाठी प्रयत्न करणे अशा पद्धतीने समस्यांचा पाढा वाचला.
सर्वांना आश्वस्त करत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी यावर बोलून व भूसंपादन च्या मोबदल्या या शेतकऱ्यांची घेऊ असे आश्वासन दिले.आज रोजी भडगाव तालुक्यातील आडळसे, जुवार्डी,घुसर्डी या गावांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक लोकांशी संवाद साधून गावकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची आश्वासन दिले.
सोबत विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे .पाचोरा तालुका अध्यक्ष विकास पाटील सर, माजी नगराध्यक्ष श्याम भोसले,भडगाव तालुका अध्यक्ष राहुल पाटील,भडगाव तालुका कार्याध्यक्ष हर्षल पाटील, स्वदेश पाटील ,भूषण सोनवणे, मोनु हिरे,झिपा आप्पा ,आडळसे येथील बाळासाहेब पाटील,सचिन पाटील,अविनाश पाटील,सुनील पाटील जुवार्डी येथील सुनील पाटील,भैय्या पाटील,वसंत पाटील,भूषण पाटील, ,घुसर्डी येथील भीमराव नाना, पोपट नाना,नानाभाऊ पाटील, व गावकरी मोठ्या संख्येने जनसंवाद यात्रेमध्ये सहभागी होते.