सोलापूर – महेश गायकवाड अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील लिं.म.नि.प्र बसवलिंगेश्वर महास्वामिजी यांच्या 90 व्या पुण्यस्मरणोत्सव निमित्ताने बसवलिंगेश्वर संस्थान तुप्पीन मठात अनेक मान्यवर म्हास्वामीजीं च्या उपस्थिती त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, यानिमित्त दोन दिवस लाखो भक्तांना तूप आणि पुरण पोळीचा प्रसाद देण्यात आहे, तर 58 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा ही संपन्न होणार आहे.
श्री ष.ब्र.श्रीकंठ शिवाचार्य महास्वामिजी नागणसूर ,श्री ष.ब्र.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामिजी गौडगांव, श्री अभिनव पुंडलिक महास्वामिजी गोळसार,व श्री अभिनव शिवलिंग महास्वामिजी वीरक्तमठ रोडगे,यांच्या दिव्य सानिध्यात तर मठाधिपती श्री.म.नी.प्र डाँ अभिनव बसवलिंग महास्वामिजी यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या शनिवार दि.8 आक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता पासून हे सर्व कार्यक्रम सुरू होणार आहेत. सकाळी पहाटे 5 वाजता बसवलिंगेश्वर महास्वामिजीच्या समाधीस महा रुद्राभिषेक होईल वपुजा संपन्न होईल, तर सकाळी सहा वाजता षटस्थल ध्वाजारोहण, होणार आहे, सकाळी 9 वाजता 58 जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा पार पडणार आहे.
या नंतर पाच हजार जंगम गळाराधना, होणार आहे यानंतर दहा वाजता सात हजार सुहासिनीच्या ओटी भरणाचा कार्यक्रम होईल , यानंतर येणाऱ्या एक लाख भक्तांना तुप आणि पुरणपोळीचा महाप्रसाद वाटप होईल तर राञी 8 वाजता लक्ष दिपोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे.
रविवारी दि.9 आक्टो रोजी सायंकाळी 5 वाजता भावचिञ व धर्म ग्रथांचे भव्य मिरवणूकीने दोन दिवस चालेल्या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे अशी माहिती श्री म नि प्र डॉ बसवलिंग महस्वामीज यांच्या वतीने देण्यात आली आहे.
.