जळगाव,(प्रतिनिधी)- माता रमाई आंबेडकर माध्यमिक विद्यालय येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मुख्याध्यापक श्रीकांत डी. तायडे यांनी माल्यार्पण करून वंदन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत तायडे होते तर प्रमुख पाहुणे विजय पाटील,शालू सैदणे यांची उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थ्यांनी,शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात श्रीकांत तायडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टो.1956 रोजी नागपूरच्या नागभूमीत 5 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा देऊन बौद्ध धम्म स्वीकारून धम्मपरीवर्तन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वलिखित राज्यघटना आपल्या भारत देशाला अर्पण करून खऱ्या अर्थाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले.डॉ. बाबासाहेबाना अभिवादन करून मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभार पुनम भंगाळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर सैंदाणे , भारती चौधरी,रवींद्र तायडे, मच्छिंद्र साळुंखे,दीपक यांनी परिश्रम घेतले.