जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचाराच्या घटना वाढतानाच दिसत आहे. अशातच आता जळगाव शहरातील महिलेवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना समोर आलीय. जळगावातील 29 वर्षीय विवाहितेवर बिहारमध्ये अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे.
29 वर्षीय पीडीता मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती कामानिमित्त जळगावातील एका भागात पतीसह राहते. विवाहितेचा पतीसोबत कौटुंबिक वाद झाला. यावेळी पीडीतेसोबत काम करणारा राजेशकुमार जयनारायण पासवान (संतोर, सहरसा, नारायणपूर, बिहार) याने फोनवरून संवाद साधत विश्वास संपादन केला.
हे पण वाचा :
मुलगी वस्तू घ्यायला दुकानात गेली, ती घरी न परतल्याने शोध घेतला, नंतर भावाला ज्या अवस्थेत सापडली..
सुसाईड नोट लिहून किनगावच्या २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या
सावधान ! कफ सिरप प्यायल्याने 66 मुलांचा मृत्यू ; WHO ने भारतातील चार कफ सिरपविरोधात जारी केला अलर्ट
शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या ; जळगावसह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी
त्यानंतर राजेशकुमार याने पीडीतेला बिहारमधील गावाकडे बोलावत तिच्यावर 6 ते 9 सप्टेंबरदरम्यान बलात्कार केला तसेच घटनेची वाच्यता कुणाकडे न करण्याबाबत धमकी दिली. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.