डॉ.अजयसिंग परदेशी यांच्या ओम हॉस्पिटलला आज आठ वर्ष पूर्ण झाली कोरोना काळातही आपली सेवा अखंड ठेवून पेशंटची सेवा सुरूच ठेवली पाचोरा येथील देशमुखवाडी भागातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल ओम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अजय सिंग परदेशी व त्यांच्या पत्नी डॉक्टर नेहा परदेशी या दोघा जोडीने आठ वर्षांपूर्वी एक छोटेसे रोपटे लाऊन सुरू केलेल्या दवाखान्याचे आज वटवृक्ष बहरला आहे.
यावेळी या दोघ दांपत्यानी रुग्णांची सेवा करण्याचा निर्धार केला त्यांनी कधीही वेळ काळ रात्र पहाट न पाहता रुग्णांच्या केव्हाही फोन येओ डॉक्टर साहेब व त्यांच्या पत्नी धावपळ करत येत असे पेशंट जवळ पैसे असो किंवा नसो पहिले पेशंटची सेवा हीच खरी त्यांची सेवा खेड्यावरील येणाऱ्या पेशंटांना योग्य सन्मान देऊन तसेच ज्येष्ठ पेशंट आले तर त्यांची विचारपूस करून त्यांना योग्य सल्ला देऊन उपचार करीत असे डॉक्टर अजय सिंग परदेशी व त्यांच्या पत्नी नेहा परदेशी यांचा अत्यंत गोड स्वभाव कधीही पेशंटचे मन न दुखवता पेशंटला चांगली वागणूक देणे.
कमी दिवसात जास्त डॉक्टर दापत्य यांनी आपले नाव कमावले कोरोना काळातही काळातही डॉक्टर अजय सिंग परदेशी व त्यांचे पत्नी डॉक्टर नेहा परदेशी यांनी न घाबरता आपल्या परिवारा पासून दूर राहून फक्त आणि फक्त दिवस-रात्र कोरोना पेशंट साठी वेळ देत गेले कारण त्या काळात सर्वसाधारण गरीब घरातले पेशंट त्यांच्याकडे दाखल होत होती त्यांनी कुठलीही आशा न ठेवता फक्त पेशंट वाचवण्यासाठी व सुखरूप घरी रवाना करण्यासाठी आपली सेवा दोन वर्ष अखंड ठेवली.
त्यांच्या या सेवेमुळे त्यांना गोरगरिबांचा आशीर्वाद लाभला व त्यामुळे आज त्यांची प्रगती होत असून त्यांच्या आशीर्वादाने डॉक्टर त्यांचे नवीन हॉस्पिटल लवकरच छत्रपती संभाजी राजे चौका रिंगरोड परिसरात सुरू होत असून लवकर त्याचे उद्घाटन होऊन रुग्णांच्या सेवेसाठी भव्य व दिव्य असे हॉस्पिटल तयार करून रुग्णांना जास्त जास्त सेवा देण्याचा त्यांचा निर्धार असून गरीब पेशंट यांना साथ देण्यासाठी नेहमी तत्पर असतात डॉक्टर साहेब मदतीचा हात हीच संकल्पना बाळगुन सेवा करण्याचा त्यांचा निर्धार आहे त्यांचा आज रोजी ओम हॉस्पिटलचे आठ वर्षे पूर्ण झाले असून नव्या वर्षी त्यांना अगनित हार्दिक शुभेच्छा