अक्कलकोट, सोलापूर(महेश गायकवाड) – अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे मंगळवार दिनांक 20 सप्टेंबर 22 रोजी सकाळी 10-30 वाजण्याच्या सुमारास अतिशय वाईट आणि दुर्दैवी आणि निंदनीय घटना उघडकीस आली आहे.या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली,महापुरुषांच्या प्रतिमा जाळून टाकण्यात आल्या आहेत तर काही प्रतिमा अर्धवट जाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होतं असून हे कृत्य करणाऱ्या अज्ञात समाजकंटकाविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
प्राप्त माहिती नुसार, अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील एस एस शेळके प्रशाळेच्या मैदानात शाळेच्या पाठीमागे मुतारी आहे. या मुतारी जवळ कचऱ्याच्या कुंडी जवळ कुणी तरी अज्ञात व्यक्तींनी मुद्दाम आणि जाणूनबुजून महापुरुषांच्या प्रतिमा फोटो जाळून टाकण्याचे कृत्य केले आहे. तर काही फोटो फोडून टाकून ते जाळले आहेत.याबाबत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात एस एस शेळके प्रशाळेचे मुख्याध्यापक अनिल रामराव देशमुख यांनी फिर्याद दाखल केली असून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वागदरी येथील एस एस शेळके प्रशालेच्या पाठीमागे मुतारी आहे त्या मुतारीजवळ च्या जागेत चार महापुरुषांच्या प्रतिमा (फोटो) जाळण्यात आले आहेत या प्रतिमा अर्धवट जळालेल्या आहेत, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा जळल्या आहेत तर मौलाना अब्दूल कलाम आझाद व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो चे फ्रेम व काच फुटले आहे. महापुरुषांच्या प्रतिमा जाळण्यात आले असल्याची माहिती कळताच अक्कलकोट तालुक्यातील सर्व आंबेडकरी नेते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत, यात रिपाई चे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडीखांबे, जेष्ठ पत्रकार कमलाकर सोनकांबळे , सचिन बनसोडे यांच्या सह पी आर पी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विकी बाबा चौधरी, वंचीत आघाडी चे तालुका अध्यक्ष चंद्रशेखर मंडीखांबे , देवा अस्वले, यांच्या सह अंबादास गायकवाड, वंचित आघाडी चे शिलामनी बनसोडे वागदरी येथील श्याम बनसोडे तसेच अंबादास शिंगे, विलास गायकवाड , सोनकांबळे, यांच्या सह इतर मान्यवर नेतेमंडळी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात वागदरी येथे दाखल झाले होते.
दरम्यान वागदरी येथे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले होते. मोठा फौज फाटा या ठिकाणी मागविण्यात आला होता एस एस शेळके प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल देशमुख आणि शिपाई रवी निलगार हे पोलीस ठाण्यात येऊन अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद दाखल केली आहे, आमच्या शाळेच्या वतीने असे कोणतेही कृत्य करण्यात आले नाही झालेली घटना कुणी तरी अज्ञातानी जाणूनबुजून शेळके प्रशालेच्या कंपाऊंड मध्ये घडवून आणली आहे यात आमचा काहीही सहभाग नाही आमच्या शाळेतील सर्व महापुरुषांचे फोटो सुरक्षित आहेत असे मुख्याद्यापक अनिल देशमुख यांनी सांगितले, याबाबत आम्ही शाळेच्या वतीने झालेल्या घटनेची फिर्याद दिली आहे असेही त्यांनी सांगितले.दरम्यान या घटनेचा पुढील तपास पीएसआय महेश भाविकट्टी हे करत आहेत.