जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौऱ्यावर आले असून त्यांच्या हस्ते आज सायंकाळी पाळधी येथील नूतन शासकीय विश्रामगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार,पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजनसह आदी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री शिंदेंची पाळधी येथे जाहीर सभा झाली. यावेळी सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. अडीच वर्षात जेवढी कामे त्यांची झाली नव्हती तेवढी कामे आम्ही अडीच वर्षात केली आहे. एकनाथ शिंदे इतका फिरतो आहे हे पाहून ते घाबरले. मी फिरायला लागलो म्हणून ते पण फिरायला लागले. मी फिरायला लागलो म्हणून त्यांना गणपती दर्शन झाले, असे नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.
हे पण वाचा :
Video: पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स ; तितक्यात पत्नी आली अन्..
काकीसोबत पुतण्या करत होता ‘रोमान्स’.. काकाने पकडलं अन्.. पुढे काय झालं ते पहा
राज्यातील या विद्यापीठात नोकरीची संधी.. तब्बल 40,000 रुपये पगार मिळेल
आम्ही कुठेही काही लक्ष देखील दिले नाही तरी आम्हाला यश मिळाले. तुमच्या सर्वांमुळे हे यश मिळाले. ये तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है. पुढच्या अडीच वर्षात हाताच्या बोटावर मोजायला देखील शिवसेना शिल्लक राहणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले. मी रात्रंदिवस काम करायला तयार आहे. एसटीचा प्रश्न देखील मी सोडवणार आहे. अन्याय दूर केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे थांबणार नाही, असा जाहीर उच्चार त्यांनी केला.