मुंबई : ज्या पद्धतीने भारतातील नागरिकांसाठी युनिक नंबरची म्हणजेच आधार कार्डची प्रणाली आहे, त्याच पद्धतीने केंद्र सरकारने जमिनीचाही एक युनिक नोंदणीकृत क्रमांक जारी करण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकारच्या वन नेशन वन नोंदणी कार्यक्रमांतर्गत हे काम केले जाणार असून यामुळे महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जमिनीच्या भूखंडाच्या तुकड्याला आता एक विशिष्ट नंबर दिला जाणार आहे.
हा दिलेला नंबर 11 अंकाचा असून त्याला आपण ULPIN असे नाव दिले आहे. हा नंबर आपल्या जमिनीच्या सातबार्यावर प्रिन्ट होऊन यायला लागला आहे. परंतु शेतकरी मित्रांनो यापूर्वी आपण जो सातबारा वापरत होतो. त्या सातबाऱ्यावर असा कोणताही नंबर येत नव्हता. मात्र इथून पुढे हा नंबर यायला सुरुवात होईल.
या नंबर मुळे शेतकऱ्यांना जमीन खरेदी विक्री करण्यास देखील मदत होईल. तसेच या नंबर मुळे कोणत्याही व्यक्तीची जमीन खरेदी करताना किंवा विक्री करताना फसवणूक होणार नाही. कारण आपल्याला या नंबर वरून त्या जमिनीचा इतिहास पाहता येईल. यामुळे सर्व व्यवहार पारदर्शक होतील.
हे पण वाचा :
तमाशाच्या फडात नाचणे भोवले ; VIDEO व्हायरल होताच पोलीस कर्मचारी निलंबित, जळगावातील प्रकार
शेतकऱ्यांनो काळजी घ्या.. जळगाव जिल्ह्याला ‘या’ तारखेपर्यंत मुसळधारचा इशारा, प्रशासनाकडून अलर्ट जारी
..अन् भररस्त्यात महिलेने तरुणाला धो-धो धुतले ; पहा ‘हा’ व्हिडिओ
पोरांनो तयारीला लागा; १०वी आणि १२वीच्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
जमिनीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर कळेल
त्याच वेळी, हा ULPIN प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM किसान योजना) सारख्या अनेक योजनांमध्ये देखील वापरला जाऊ शकतो. याशिवाय, युल्पिन क्रमांकाद्वारे देशात कुठेही जमीन खरेदी-विक्री करताना कोणतीही अडचण येणार नाही. खरेदीदार आणि विक्रेता यांचे संपूर्ण तपशील उघड केले जातील. त्या जमिनीचे आणखी विभाजन झाल्यास त्या जमिनीचा आधार क्रमांक वेगळा असेल.