बोदवड,(सचिन पाटील)-देशाचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दि.१७ सप्टेंबर रोजी असलेल्या वाढदिवस निमित्त त्यांचा वाढदिवस देशभरात ‘सेवा समर्पण पंधरवाड़ा’म्हणून विविध उपक्रम राबवून साजरा होणार आहे, त्यात विविध आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्ररोग तपासणी शिबिर, शासकीय प्रलंबित कामे पूर्ण करण्यासंदर्भात शिबिर असे विविध समाजपयोगी कामे होणार आहे. त्याचे नियोजन संदर्भात आज १६ सप्टेंबर रोजी खा. रक्षा खडसे यांच्या उपस्थितितीत भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ता यांची बैठक संपन्न झाली.
हे पण वाचा
BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..
तरुणांनो संधी सोडू नका.. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स सेंटरमध्ये तब्बल 3068 पदांची भरती
सरकारी अधिकारी होण्याची सुवर्णसंधी.. फक्त ही पात्रता ठेवा, मिळेल चांगला पगार
नोकरीची मोठी संधी. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लि.मध्ये मेगाभरती
यावेळी बेटी पढ़ाव, बेटी बचाव चे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फड़के, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष नंदु महाजन ज्येष्ठ मार्गदर्शक अनंत कुलकर्णी, बोदवड़ भा.ज.पा तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील उपस्थित होते. त्यात राष्ट्रवादीत गेलेले पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टीचे दिग्गज नेते मधुकर राणे, अतुल राणे, देवराम सुपे, महेश पाटील,श्रीकृष्ण राणे, राजेंद्र पाटील हे सुद्धा आमदगावच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होते व लवकरच ते महाराष्ट्राचे मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या हस्ते बोदवड़ तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पाड़त शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करणार आहे. असे भारतीय जनता पार्टीचे सोशल मिडिया तालुकाध्यक्ष रोहीत अग्रवाल यांनी कळवले आहे.