जळगाव/मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा न्यायालयीन तिढा अद्याप कायम असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने रात्री उशिरा नेते पदाच्या ५ तर उपनेते पदाच्या २६ जणांची नावे जाहीर केली. यात जळगावातील मंत्री गुलाबराव पाटील यांना नेतेपदी तर आमदार चिमणराव पाटील यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी रात्री नरिमन पाइंट येथील महिला विकास महामंडळ येथे एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिंदे गटाच्या नेते आणि उपनेतेपदाची नावे निश्चित करण्यात आली यात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा नेत्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत खासदार भावना गवळी, माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा देखील समावेश आहे.
हे पण वाचा..
पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला बनवेल करोडपती ; करावी लागेल फक्त 417 रुपयांची गुंतवणूक
लग्नाचे आमिष देत ठेवले शारीरिक संबंध ; भाजप पदाधिकाऱ्यावर अत्याचाराचा गुन्ह्याने खळबळ
अखेर ‘त्या’ऑडिओ क्लिप प्रकरणी ‘एलसीबी’चे पो.नि. किरणकुमार बकाले यांचं निलंबन
दरम्यान, यासोबत उपनेतेपदांच्या नियुक्तीत जळगाव जिल्ह्यातून पारोळा-एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित उपनेत्यांमध्ये अनिल बाबर,दादाजी भुसे, गोपीकिसन बाजोरिया,श्रीरंग बारणे, ज्ञानराज चौगुले, शंभुराज देसाई, भरत गोगावले, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, दीपक केसरकर, शीतल म्हात्रे, विजय नाहाटा, हेमंत पाटील, शहाजीबापू पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, शरद पोंक्षे, रवींद्र फाटक,संजय राठोड, उदय सामंत, तानाजी सावंत,सदा सरवणकर,राहुल शेवाळे, विजय शिवतारे, कृपाल तुमाणे, संध्या वढावकर यांचा समावेश आहे.