मुंबई : सध्या शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी गिरगाव कोर्टाने धक्का दिला आहे. राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी कोर्टाकडून बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बच्चू कडू यांनी विविध राजकीय आंदोलनातील प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला होता. आज गिरगाव न्यायालयाने तो फेटाळून लावत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बच्चू कडू याना ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिल्यांनतर बच्चू कडू तुरुंगात जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी लगेच सत्र न्यायालयात अपील केले आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निर्णयानंतरच बच्चू कडू तुरुंगात जाणार की नाही याबाबत निर्णय होईल.
काय आहे प्रकरण ?
30 मार्च 2016 रोजी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता, 30 मार्च 2016ला दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते.
सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता, मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.
हे पण वाचा..
एलसीबीच्या निरिक्षकांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली ; नेमकं काय आहे कारण?
उद्यापासून धावणार भुसावळ-देवळाली मेमू,पण 8 स्थानकांवरील थांबे रद्द, प्रवासाआधी जाणून घ्या
RD मध्ये दरमहा 1000 रुपये जमा करा, 5 वर्षांत मिळतील ‘इतके’ रुपये
बेकायदा काम करून घेण्यासाठी कडू हे गावित यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या घटनेकडे काँग्रेसचे सदस्य सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. ‘राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे’, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं होतं. मात्र आपण त्या अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांनी केला होता. अखेर,संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.