अमळनेर (गौरवकुमार पाटील)- अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदीर परिसरात मुडावद येथील एकाने तार कंपाऊंड सुरू करून जागा बळविण्याचा प्रयत्न सुरू केल्याने आणि उर्वरित ९० आर जमिनीचा विषय प्रलंबित असल्याने वारंवार निवेदन देऊनही झोपेचे सोंग घेणाऱ्या महसूल प्रशासनाला जागे करण्यासाठी श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांसह मंदिर संस्थानचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराज यांनी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात आज दिनांक १३ रोजी सकाळी १० वाजता पाडळसरे परिसरातील शेतकरी ग्रामस्थांसह तालुक्यातील हंसानंद महाराज भक्त परिवार , पाठशाळेतील विद्यार्थी व कपिलेश्वर भक्तांनी एकत्र जमून ” हरे राम राम राम म्हणत रामधून ” भजन आंदोलन सुरू केले होते.
मात्र आमदार अनिल पाटलांच्या मध्यस्थीमुळे तहसीलदारांनी मंदिर परिसरात सुरू असलेल्या तार कंपाउंडच्या इतर अनधिकृत कामास स्थगिती देण्याचे आश्वासन दिल्याने आमदारांच्या व तहसीलदारांच्या आश्वासक सूचनेनुसार हे आंदोलन स्थगित करण्यात आले. श्रीक्षेत्र कपिलेश्वराची आरती करून मठाधिपती ट्रस्टीसह गावकरी आणि पाठशाळेतील बालकांना सोबत घेऊन सकाळी १० वाजताच तहसील कार्यालयात पोहोचले आणि मंडप टाकून टाळ मृदुगाच्या गजरात हरे राम राम राम असा रामधून म्हणून आंदोलनास सुरुवात झाली.
नोकरीच्या शोधात असाल तर ????????येथे क्लिक करून वाचा
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये ‘पाच हजार’ पदांची मोठी भरती
SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांसाठी बंपर भरती, संधी सोडू नका..
सरकारच्या ‘या’ कंपनीत तब्बल 5000 पेक्षा अधिक जागांसाठी भरती
२ लाख ८० हजार रुपये इतक्या पगाराची नोकरीसाठी अर्ज करा…
ST महामंडळात निघाली मोठी भरती, 8वी-10वी पाससाठी मोठा चान्स ; आताच अर्ज करा
10वी पास आहात? मग पोस्टमध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी..
महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात ‘या’ पदांसाठी आजच करा अर्ज
दुपारी मंदिरचे पाच विश्वस्थानी तहसीलदार मिलिंद वाघ यांना प्रत्यक्ष भेटून मागण्याचे निवेदन देण्यात आले यात म्हटले की सदर मंदिराची जागा १५ एकर ८ आर असून शाहसिंग गरजू भिला यांना १२.८ क्षेत्र विकलेला आहे, उर्वरित ९० आर जमीन कपिलेश्वर मंदिराचीच आहे,त्याची चौकशी नाशिक विभागीय कार्यालय आणि अमळनेर तहसील कार्यालयाद्वारा सुरू आहे,तत्पूर्वी मूडावद येथील वाकडे परिवार अनधिकृतपणे या जागेवर कंपाऊंड टाकून अतिक्रमण करीत आहे,त्यांना बोलायला गेल्यास ते हमरीतुमरी करतात, आम्ही शासकीय स्वच्छतागृह बांधलेले असताना त्याचाही रस्ता या लोकांनी दादागिरीने बंद केला आहे,व आता तारेचे कंपाऊंड करीत आहे,तरी हे काम तात्काळ बंद व्हावे अशी मागणी यात करण्यात आली. याबाबत मार्च महिन्यापासून निवेदन दिले असूनही महसूल प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याने महसूल प्रशासनाला जागे करण्यासाठी भजन आंदोलन तहसीलदार आवारात सुरू असल्याचे कळवले , याचवेळी आमदार अनिल पाटील दाखल झाल्याने तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली,यावेळ खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ अनिल शिंदे,मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाने, प्रा अशोक पवार,ट्रस्टचे सचिव मगन वामन पाटील , सी एस चौधरी , तुकाराम चौधरी , छोटू चौधरी पदाधिकारी व पत्रकार वसंतराव पाटील , संजय पाटील , चेतन राजपूत , किरण पाटील , चंदू काटे , आर जे पाटील , अमोल पाटील , महेंद्र रामोशी , जितू ठाकूर आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदारांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कामास स्थगिती देण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी मंदिर विश्वस्थाना दिले.तसेच जागेची शासकीय मोजणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
दोन्ही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक घेणार – आमदार अनिल पाटील
यावेळी कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर हंसानंद महाराज व आंदोलकाकांशी हितगुज करताना आमदार अनिल पाटील म्हणाले की कपिलेश्वर मंदिर ७०० वर्षे पुरातन असल्याने या मंदिराशी प्रचंड मोठ्या प्रमाणात भाविकांची श्रद्धा असल्याने ,तूर्तास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्या कामाला स्थगिती दिली जाणार आहे,मात्र त्यानंतर शासकीय मोजणी करून समोरील व्यक्तींनाही विश्वासात घेत हा प्रश्न सोडविला जाईल,यासाठी धुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी लवकरच एकत्र बैठक घेऊन योग्य मार्ग काढू,तोपर्यंत थोडी समाज्यसाची भूमिका भजन आंदोलकांनी घ्यावी लागेल पण मार्ग नक्की निघेल अशी ग्वाही आमदारांनी दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.
सदर आंदोलनात महामंडलेश्वर हंसानंद तीर्थ महाराज,मगन वामन पाटील,घनश्याम अग्रवाल, सी एस पाटील,तुकाराम धोंडू चौधरी,छोटू ताराचंद पाटील,रामानंद तीर्थजी महाराज,परमेश्वर महाराज,महेश महाराज,चंपालाल पाटील,मगन पाटील,धुडकू पाटील,विजय चौधरी,गयबु पाटील,एस एम पाटील,रणछोड पाटील,नरेंद्र पाटील,ऍड राजेंद्र चौधरी,मंगल वाघ व पानाचंद पाटील आदी सहभागी झाले होते.