चोपडा,(प्रतिनिधी) :- अखिल भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा तालुका व शहर कार्यकारणी यांच्यावतीने 10 वी मध्ये 75% व 12वी परीक्षेत 70 % पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित गुणगौरव सत्कार चोपडा नगरपालिकाचे नाट्यगृह या ठिकाणी करण्यात आला. सदर संघटनेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या परंपरेला कायम ठेवत गुणवंत विद्यार्थ्यांच्या भावी यशाला प्रेरणा देण्यासाठी युवक संघटनेच्या शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व मेडल स्वरूपाची भेटवस्तू देऊन पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
चोपडा तालुक्यातील दहावीच्या परीक्षेत संपूर्ण तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविणारी माळी समाजाचे भूषण असलेली कु.सायली महाजन 98.40%,किंजल माळी 96.80% द्वितीय, मयुरी बागुल 95.80% तृतीय, त्याच बरोबर 12 वी मध्ये ओम महाजन 87.67% प्रथम, हर्षदा माळी 85.67% द्वितीय, तुषार महाजन 84.67% तृतीय, येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला अशा पद्धतीने विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा संघटनेच्या वतीने सत्कार आला.
चोपडा तालुक्यातील जवळपास ८० विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आले. युवक संघाच्या वतीने दरवर्षीच अशाच पद्धतीचे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे सेवानिवृत्त अधिक्षक डी जी माळी साहेब हे होते तर उद्घाटक भारतीय सैन्यदलाचे नायब सुभेदार अमोल माळी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव जळगाव येथील वस्तू व सेवा कर कार्यालयाचे राज्यकर अधिकारी रविंद्र पुंडलिक महाजन, क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात चे अध्यक्ष ए के गंभीर सर, चोपडा तहसिल कार्यालयाचे प्रभारी नायब तहसीलदार रविंद्र माळी यांच्या शुभहस्ते गुणवंत करण्यात आला.

प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन, लासुर येथील लोकनियुक्त सरपंच जनाताई माळी,अडावद येथील लोकनियुक्त सरपंच भावना महाजन, विभागीय उपाध्यक्ष लक्ष्मण महाजन, विभाग संपर्कप्रमुख समाधान माळी सर,विभागीय संघटक,विनायक महाजन, जिल्हा अध्यक्ष महेंद्र महाजन, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा
संध्या महाजन,जिल्हा अध्यक्ष वारकरी आघाडी हभप पांडुरंग महाराज,जिल्हा उपाध्यक्ष अल्केश महाजन, माळी समाज पाटील गढीचे अध्यक्ष सुरेश महाजन लहान माळी वाडा येथील अध्यक्ष गुलाब माळी, मल्हारपुरा माळी समाजाचे अध्यक्ष के एस महाजन, चहार्डी येथील माळी समाजाचे अध्यक्ष चेतन महाजन, लासुर येथील संत सावता महाराज पतसंस्थेचे संचालक एच एच माळी सर,जे बी डेव्हलपर्सचे संचालक दीपक महाजन, कृषी पर्यवेक्षक महेंद्र महाजन, ग्रामसेवक किशोर मगरे, तलाठी किरण महाजन तलाठी, माळी भूषणचे संपादक भीमराव महाजन , महाजन इंग्लिश क्लासेसचे संचालक दीपक महाजन सर, लासुर येथील सरस्वती क्लासेसचे संचालक विनोद महाजन सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविकात श्री संत सावता माळी युवक संघाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र महाजन यांनी संघटनेच्या माध्यमातून घेतलेला गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांच्या भावी यशाला प्रेरणा देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे तसेच वर्षभरात राबविण्यात येणारे उपक्रमा बाबत माहिती दिली.राज्यकर अधिकारी रविंद्र महाजन यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय पदावर काम करताना आलेले अनुभव कथन केले व विद्यार्थीनी प्रशासकीय अधिकारी होणेसाठी स्पर्धा परिक्षेकडे वळावे असे आव्हान केले.कार्यक्रमाचे उदघाटन नायबसुभेदार अमोल माळी यांनी विद्यार्थ्यांना सैन्यदलात सुद्धा उच्च पदावर पोहचता येते याबाबत सैन्यदलातील विविध विभागातील इंजिनिअरिंग तसेच वैद्यकीय क्षेत्राचे पदाबाबत माहिती दिली.
अध्यक्षयी भाषणात उत्पादन शुक्ल विभागातील सेवानिवृत्त अधिक्षक डी जी माळी यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पालकांसोबत चर्चा करून निर्णय घ्यावा तसेच आपल्या आई व वडिलांची सेवा करावी व कितीही मोठ्या पदावर गेले तरीही कुटुंबाचे व समाजाचे ऋण न विसरता कार्य करावे असे मत मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे चोपडा तालुका अध्यक्ष रोहित माळी, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल माळी,चोपडा शहर अध्यक्ष विजय माळी, चहार्डी शाखा अध्यक्ष शशिकांत राऊळ, सागर माळी, मयूर माळी विक्की सोनार, राहुल मगरे, प्रमोद मगरे आदी संघटनेचे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र महाजन सर जळगांव जिल्हा कार्याध्यक्ष, आभार प्रदर्शन समाधान माळी विभागीय संपर्कप्रमुख यांनी केले.