शेखर आमच्या अंत्यत जवळचे नातेवाईक होते,
ते अंत्यत धाडसी नेत्रत्व होते, परंतु अचानक त्यांचे जाणे म्हणजे सर्वाना चटका लावुन जाणारी मोठी वाईट दुर्घटना आहे. अशा शब्दात सोलापूर शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस सुयश गायकवाड यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. शेखर कांबळे यांचे अचानक जाणे म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील लोककलेला आणि भिम शाहिरीला झालेले सर्वात मोठे नुकसान आहे ,शेखर कांबळे हे सर्वधर्मसमभावाचे मूर्तिमंत उदाहरण होते ते उस्मानाबाद जिल्ह्यातील जेष्ठ लोकशाहीर आणि भीमशाहिर व थोर जलसाकार होते . आज सायंकाळी हजारो मान्यवरांच्या आणि लोककलाकारांच्या उपस्थितीत शेखर कांबळे यांच्या पार्थिवावर आलुर या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.