नाशिक – गेल्या दहा दिवसांपासून उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आल्यानंतर आज आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. गेली दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र यंदा निर्बंध नसल्याने देशासह राज्यात गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत जल्लोष पाहायला मिळतोय.
दरम्यान, जुन्या नाशिकमधील वाकडी बारव इथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक मार्गस्थ झाली आहे. यावेळी राज्याचे मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते पूजा आणि आरती झाल्यानंतर श्रीफळ वाढवून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला.
हे पण वाचा :
मनरेगा योजना म्हणजे काय? काय आहे त्याचे फायदे, त्वरित जाणून घ्या
राज्यात ‘या’ कुटुंबियांसाठी निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप ; अर्ज कसा आणि कुठे कराल ?
तिरंग्याच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारा ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हीही संतापला!
नीट परीक्षेत गुण कमी पडल्यामुळे तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, मनपा आयुक्त पुलकुंडवार, माजी महापौर वसंत गीते, विनायक पांडे लक्ष्मण सावजी, सतीश शुक्ल,समीर शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोषात गणपती बाप्पाला नाशिककरांनी निरोप देण्यासाठीची ही मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालण्याची शक्यता आहे. मिरवणुकीत पोलिसांकडून देखील चूक बंदोबस्त ठेवण्यात आला असून जागोजागी विविध मंडळांच्या वतीने उभारण्यात आलेल्या मंडपातून लाऊड स्पीकर द्वारे गणेश मंडळे आणि गणेश भक्तांचे स्वागत केले जात आहे.