हिंगोली : अलीकडे मोबाईलवर सोशल मीडियावर निर्माण झालेल्या ओळखीतून अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. फेसबुकद्वारे झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण करून तरुणीवर वारंवार अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. ही घटना हिंगोली शहरालगत असलेल्या बोळसोंड भागात घडलीय. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जवळाबाजार येथील एक तरुणी मागील काही वर्षापासून हिंगोली शहरालगत बळसोंड भागात राहण्यासाठी आली होती. यावेळी तरुणीची फेसबुकद्वारे जुनेद शमीउल्लाखाँ पठाण (रा.पेन्शनपुरा, हिंगोली) याच्या सोबत ओळख झाली. जुनेदने त्या तरूणीसोबत फेसबुकद्वारे चॅटींग करून तिच्या सोबत ओळख वाढवली. त्यानंतर तिच्याशी वारंवार संपर्क साधून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
जुनेद याने तरुणीला लग्नाचे आमिषही दाखविले. लग्नाच्या आमिषाला बळी पडल्याले त्या तरुणीवर जुनेद याने मागील एक वर्षापासून अत्याचार केले. तसेच जुनेद याचा भाऊ अजमत शमीउल्लाखाँ पठाण याने त्या तरुणीला ‘तु माझ्या भावा सोबत राहू नको, तु त्याला सोडून दे’, असे म्हणून तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
हे पण वाचा :
सरकारच्या ‘या’ योजनेत एकदाच पैसे भरा अन् वयाच्या ६० नंतर दरमहा मिळवा पेन्शन!
जळगावमध्ये नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंना ललकारलं ; वाचा काय म्हणाल्या…
पैसे वाटपावरुन पोलीस आणि होमगार्डमध्ये हाणामारी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ST महामंडळात निघाली मोठी भरती, 8वी-10वी पाससाठी मोठा चान्स ; आताच अर्ज करा
या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने शनिवारी रात्री थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जुनेद पठाण व त्याचा भाऊ अजमत पठाण याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक मुपडे, जमादार अशोक धामणे, आकाश पंडीतकर, गजानन पोकळे यांच्या पथकाने रात्रीच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.