जळगाव :वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील नेहमीच चर्चेत असताता. शिंदे गटात येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असताना देखील त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. अशातच आता त्यांनी एक वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षकांनाच विद्यार्थ्यांची फोडाफोडा करण्याचा अजब सल्ला त्यांनी दिला आहे.
ज्याप्रमाणे पक्षाचे लोक फोडले जातात, तसेच इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी फोडा अशी आयडिया गुलाबराव पाटील मराठी माध्यमांची पटसंख्या वाढवण्यासाठी शिक्षकांना दिली आहे.
जळगाव जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रमुख अथिती म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी ते बोलत होते.
इतकंच नव्हे तर त्यांनी भ्रष्टाचाराबाबतही एक धक्कादायक विधान केले. आज काल कोण करप्ट नाही, आजची सगळी दुनिया करप्ट आहे, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. या देशात एकमेव नॉन करप्ट प्राणी म्हणजे शिक्षक असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी शिक्षकांचा उदो उदो देखील केला. मंत्री गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.