मुंबई : मागील काही दिवसापासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा राज्यातील विविध भागात हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. लांबलेल्या पावसामुळे खरीप पिके धोक्यात आली होती. परंतु, गेल्या तीन-चार दिवसांपासून पुन्हा राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान खात्याने राज्यातील काही भागात पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे 3, 4 दिवस गडगडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे व जळगावसह मराठवाड्यातील जालना वगळता सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हे पण वाचा :
ST महामंडळात निघाली मोठी भरती, 8वी-10वी पाससाठी मोठा चान्स ; आताच अर्ज करा
केन्द्रीय विद्यालय संगठन वरणगाव येथे ‘या’ पदांसाठी भरती
अरे बापरे.. फॉलोअर्स वाढवण्यासाठी पतीने पत्नीचे आंघोळ करतानाचे अश्लील फोटो-व्हिडीओ फेसबुकवर टाकले
युवक रेल्वे ट्रॅकजवळ बनवत होता ‘इंस्टाग्राम रील’, तेवढ्यात मागून आली ट्रेन अन्.. पहा हा थरार Video
या भागांना अलर्ट जारी
मंगळवारी (६ सप्टेंबर) मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात तसेच विदर्भ मध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर बुधवारी (७ सप्टेंबर) पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.